24.8 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

0
30

गोंदिया,दि.23 :सातत्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.भंडारा-गोंदिया लोकसभेची पोट निवडणूक २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीवर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुुटुंबासह बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमीत करण्यासाठी अनेकवेळा धरणे आंदोलन, मोर्चे काढून स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही यावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ आश्वासनावरच कंत्राटी कर्मचाऱ्यांना भागवावे लागले. यामुळे सरकारच्या उदासिन धोरणाला कंटाळून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतरही शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारात न घेतल्यास २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, उपाध्यक्ष अतूल गजभिये, सचिव विकास कापसे, कोषाध्यक्ष प्रकाश रहमतकर, स्वप्नील अग्रवाल, भागचंद रहांगडाले, कुलदीपीका बोरकर, दिशा मेश्राम, ग्रीष्मा वाहने, राजू येडे, मनोज तिवारी, मनोज बोपचे, जितेंद्र येरपुडे, उमेश भरणे, गजानन धावडे, राजन चौबे, श्रीकांत त्रिपाठी, डी.जी. ठाकरे व इतरांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन सुध्दा निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना दिले आहे.