बिलोली,दि.29ः- शहरातील देशमुख नगर येथील शेतमजूर माधवराव नागोबा ईबितवार वय ७0 यांच्यावर दि 27 मे रविवार दुपारी 3 च्या सुमारास पवनकर नर्सीग मक्काजी यांच्याशेतात काम करुन घराकडे येत असताना बळवंते संभाजी यांच्या शेताजवळ रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. यात माधवराव ईबितवार हे गंभीर जखमी झाले होते .
जखमी झालेले ईबितवार यांच्या आरडाओरड्याने शेजारील शेतात काम करीत असलेले शेतकरी जोरजोरात ओरडत आल्याने डुकराने तेथून पळ काढला. यावेळी शेतक-याच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या ईबितवार यांना बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता . त्यांचा दोन दिवसा पासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दि. 29 मे मंगळवारी त्यांचा दुपारी मुत्यू झाला . रान डूक्कराच्या हल्लात जिव गेला असून यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.