नक्षल चकमकीत दर्रेकसादलमचा उपकमांडर आजाद ठार

0
10
file photo
गोंदिया,दि.२९-महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सिमेला लागून असलेल्या राजनादंगाव जिल्ह्यातील बोरतलाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कनघुर्राजवळील चंदियाडोंगरीच्या जंगलात छत्तीसगड पोलीसांनी बक्षिस असलेल्या तीन नक्षल्यांना चकमकीदरम्यान ठार केल्याची घटना आज (दि.२९)घडली.मंगळवारला सकाली नक्षलवादी जंगलात असल्याची माहिती मिळाल्यानंतर निघालेल्या डीआरबी पोलीस फोर्स संर्चिंगकरीत असतांना नक्षल्यांनी गोळीबार सुरु केला.यात पोलिसांनीही प्रतित्युरादाखल केलेल्या गोळीबारात नक्षलवादी ठार झाले.
घटनास्थळावर मिळालेल्या मृतदेहामध्ये दर्रेकसा दलमचा उपकमांडर आजाद याचाही समावेश आहे,त्याच्यावर ५ लाखाचे बक्षिस होते.इतर दोन मृतदेहांची अद्यापही ओळख पटलेली नाही.या चकमकीमध्ये इतर नक्षल्यांनाही गोळी लागली असून ते जखमी अवस्थेत घनदाट जंगलाचा लाभ घेत पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.तर ज्या दोघांचे मृतदेह आढळले ते या नक्षल्यांचे सामान वाहक असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.अद्यापही जंगलात सर्चिग सुरुच आहे.तेंदुपत्ता व्यवसायीकाकडे पैशाच्या मागणीसाठी हे नक्षलवादी आले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.दरम्यान या घटनेसंदर्भात गोंदियाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोडे यांना विचारणा केली असता त्यांनी राजनांदगाव पोलीसांच्या चकमकीत आजाद ठार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.