अंशकालीन कर्मचार्‍यांना जीआरची प्रतीक्षा

0
93

भंडारा,दि.30ः-पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत समाविष्ठ करावे या मागणीसाठी लवकरच जीआर निघणार असल्याचे कर्मचारी समितीच्या मुंबई येथे झालेल्या सकारात्मक बैठकीत स्पष्ट झाले.
पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांना शासन सेवेत समाविष्ठ करावे या मागणीसाठी २00७ पासून प्रयत्न सुरू होते. शासनाने २00९ ला स्पर्धा परीक्षेत १0 टक्के समांतर आरक्षण व ४६ वर्षे वयोर्मयादा दिली. मात्र, अंशकालीन कर्मचार्‍यांचे वय पाहता थेट नियुक्ती द्यावी, या मागणीसाठी रेखा आहेरराव यांच्या नेतृत्वात मुंबईच्या आझाद मैदानात ५८ दिवस विविध आंदोलने झाली. आंदोलनामुळे फाईन क्रं. ८0 तयार झाली. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संघटनेसोबत मंत्रालयाची बैठक घेऊन डाटाबेस तयार करण्याचे आदेश विभागाच्या सचिवांना दिले.
सर्व विभागाची मान्यता फाईलला प्राप्त झाली. मुख्यमंत्र्यांनी नोकरीत समाविष्ट करण्याचे निर्देश व समिती गठित करण्याच्या सुचना दिल्या. ना. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली अनिल सोले, सुधीर तांबे, चरण वाघमारे, रेखा आहेरराव यांची समिती गठित करून सह्याद्र सभागृह मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी यादीतील १८५४४ कर्मचर्‍यांना जिल्ह्यातच नोकरी देण्यात यावी, असे सकारात्मक मुद्दे मांडण्यात आले.यास आ. सुधीर तांबे यांनी अनुमोदन देऊन संभाजी पाटील निलंगेकर यांनी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्याचे निर्देश सचिवांना दिले आहेत. त्यामुळे लवकरच पदवीधर अंशकालीन कर्मचार्‍यांचा जीआर निघणार असून नोकरीचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे समितीच्या अशासकीय सदस्या रेखा अहेरराव यांच्या नेतृत्वातील जिल्हा व तालुका अध्यक्षांनी कळविले आहे. असे विदर्भजिल्हा अध्यक्षराजेश शहारे, पाकेश धांडे, अनिल गोस्वामी, एकनाथ बांगरे, आशिर्वाद डहाके, सतीश पटले, महेंद्र बडवाईक, ललेंद्र गजभिये, काफीलाल आकरे, ओमदास टेंभुर्णे, राजकुमार वलके, सरिता घोल्लर, माधुरी बेहरे, सुरेखा डोंगरे, संगीता माटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.