26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

जंगलात वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार

0
22

चंद्रपूर,दि.30: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वांद्रा बिट पवनपार एरिया कक्ष १६५ मध्ये बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका गावकऱ्याचा मृतदेह आढळून आला. जैराम कन्हाजी कोल्हे (७०) असे या इसमाचे नाव आहे. तो मंगळवारी संध्याकाळी जंगलात सिंदी तोडण्यासाठी गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो परत न आल्याने बुधवारी सकाळी त्याच्या घरच्यांनी त्याचा जंगलात शोध घेतला असता त्याच्या देहाचे अवयव आढळून आले. ही बातमी वनपरिक्षेत्रअधिकाºयांऱ्यांना कळवताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगावकर हे अधिक तपास करीत आहेत.