कलम ३३ (१) (अ) लागू,मतमोजणी क्षेत्रात सकाळी ६ ते सायंकाळी ११ वाजेपर्यंत

0
11

भंडारा, दि. ३० :- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोटनिवडणूक २०१८ ची ईव्हिएम स्ट्राँगरुम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे असून ३१ मे २०१८ रोजी या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक पर्यंत रस्त्यावरुन येणारे जाणारे वाहनांची आवागमन मोठया प्रमाणात होत असल्याने मतमोजणी बंदोबस्त दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून मतमोजणी प्रक्रिया दरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम ठेवणे आवश्यक आहे.
यासाठी पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये कलम ३३ (१) (अ) ३१ मे २०१८ चे सकाळी ६ वाजतापासून ते रात्री २३.०० वाजतापर्यंत लागू केली आहे. कलम ३३ (१) (अ) जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक पर्यंत व त्यास मिळणारे इतर रस्त्यावरुन होत असलेली सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती बंद करण्याकरीता अंमलात राहील.