23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News यवतमाळमध्ये कार-ट्रक अपघातात 10 जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये कार-ट्रक अपघातात 10 जणांचा मृत्यू

0
24

यवतमाळ,दि.01:  नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमध्ये दर्शनासाठी जात असताना कोसदनी घाटात हा अपघात झाला.
दिल्लीतील शीख कुटुंब दर्शनासाठी नांदेडला आले होते. हे कुटुंब तीन गाड्यांमधून प्रवास करत होतं. यातील एका गाडीला कोसदनी घाटात भीषण अपघात झाला. गाडीला ट्रकने धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार पुरुष, चार महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.