पटोलेंचा वैयक्तिक विरोध भाजपला ठरला धक्का देणारा

0
12

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.01– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकèयांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरात मोर्चाच उघडला होेता. जेव्हा केव्हा या पोटनिवडणुकीची घोषणा होईल तेव्हा पटोलेंचा अहंभाव उतरविण्याचा चंग राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपने बांधला होता.सत्ताधारी भाजपच्या सर्वांनीच पटोलेंवर टिकेची झोळ उठविलेली असताना मात्र या निवडणुकीत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांच्या सहकार्याने भाजपच्या नेत्यांना वैयक्तीक संपर्क,नुक्कडसभेच्या माध्यमातून सरकारच्या विकासकामाची पोलखोल करुन चांगलाच धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत. भंडारा-गोंदियातील पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भातील वर्चस्वाला घरघर लागल्याचे मानले जात आहे.गोरखपूर टू गोंदिया असा हा निकाल असल्याची काहींनी प्रतिक्रिया सुद्दा व्यक्त केली आहे.कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरूवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि पटले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर मधुकर कुकडे यांनी सातत्याने आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार एल. के. मडावी हे तिस-या स्थानावर राहिले. पाहिजे तसे मतदान झाले नाही,बीआरएसपीलाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही.विशेष म्हणजे भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री,मध्यप्रदेशचे मंत्री,राज्याचे अर्थमंत्री,ऊर्जामंत्री,कामगार मंत्री,राष्ट्रीय प्रवक्ते,प्रदेशाध्यक्ष,आमदार,शेजारील खासदारांसह सर्वांनीच आपल्या उमेदवाराच्या प्रचाराच्यावेळी आपल्या सरकारने काय केले हे सांगण्यापेक्षा नाना पटोले यांच्यावरच वैयक्तिक पातळीवर टिका केल्याचे दिसून आले होते.विशेष करुन राज्याचे ऊर्जामंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांनी तर अक्षरंश प्रत्येक सभेत पटोलेंच्याविरोधात बोलूनच प्रचाराची सुरवात केल्याने बहुधा हा वैयक्तिक विरोधच भाजपच्या उमेदवाराला पराभवासाठी महत्वाचा ठरला म्हणण्यास वावगे होणार नाही.त्यातच गोंदियाचे पालकमंत्री असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आपल्या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला पुढे नेता आले नाही,यावरुन त्या मतदारसंघात मंत्रीमहोदयाबद्दल किती नाराजी आहे हे या निकालातूनही स्पष्ट झाल्याचे चित्र समोर आले आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला.त्या निकालाकडे बघून काँगे्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनी जो विश्वास उमेदवारावर दाखविला तेवढाच अवविश्वास सरकारच्या कारभारावर दाखविल्यामूळेच सत्ताधारी भाजपच्या उमेदवाराला तब्बल ४९ हजार मतांनी पराभव स्विकारावा लागला.त्यातच माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणुक होत असल्याचे वैयक्तिक आरोप करुन भाजपच्या नेत्यांना प्रचारात गाठलेली पातळीही त्यांच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरली आहे.सोबतच दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना पक्षात सामावून घेतल्यानंतरही भाजप उमेदवाराला तुमसर व गोंदिया विधानसभा मतदारसंघात पाहिजे तसा लाभ झाल्याचे चित्र कुठेच दिसून येत नाही.मात्र ६६०२ मतदारांनी नोटा बदन दाबून आपल्याला कुठलाही उमेदवार पंसत नसल्याचे स्पष्ट केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३ तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली.तिसèया क्रमांकावर भारीप बहुजनमहासंघाचे एल.के.मडावी राहिले यांनी ४० हजार ३२६ मते मिळविली.

मिळालेल्या मतांचा विचार केल्यास ४ मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला तर २ मतदारसंघात भाजप उमेदवाराला मतामध्ये आघाडी घेता आलेली आहे. राष्ट्रवादीचे उमेदावर मधुकर कुकडे यांना तुमसर विधानसभा मतदारसंघाने दिलेली १८८८२ हजाराची आघाडी महत्वाची ठरली आहे.त्यानंतर साकोली मतदारसंघातील १५१६९ हजार,अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील १२२८७ हजार,तिरोडा मतदारसंघातील  ७१२८ हजाराचे मिळालेले मताध्यिक हे त्या मतदारसंघातील आमदारांचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार असून या मतदारसंघात मात्र भाजपचे उमेदवार हेमंत पटलेंना २३१४मतांची आघाडी मिळाली तर भंडारा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपउमेदवाराला ३८०५ मताची आघाडी मिळाली आहे.भंडारा मतदारसंघात भारीप बहुजनमहासंघाच्या उमेदवाराने  १५५९४ व गोंदिया मतदारसंघात ३६३९ घेतलेल्या मतांचा फटका काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला बसल्याने याठिकाणी भाजप उमेदवाराला लाभ मिळालेला आहे. या सर्व निकालाकडे बघता ज्यापध्दतीने काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराकरीता काम केले त्यापध्दतीने राष्ट्रवादीने जर प्रत्येक निवडणुकीत सहकार्याची भूमिका घेतली तर विधानसभा व लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विजयरथाला कुणी रोखू शकणार नाही.त्यातच यावेळी राष्ट्रवादीने अर्थकारणाचा कमी केलेला प्रभाव आणि प्रचारसभावंर कमी प्रमाणात केलेले लक्ष्य लोकांच्या मनात असतानाच नानाभाऊंनी मात्र ही निवडणुक आपल्या मनात खुणगाठ बांधून घेतल्याने त्यांच्यासाठी महत्वाची होती.प्रफुल पटेलापेंक्षा पटोलेंच्या अस्तितावासाठी ही निवडणुक महत्वाची असल्याने आजच्या निवडणुकीचा निकाल हा फडणवीस व गडकरीलांना धक्का देणाराच म्हणावा लागेल.