26.4 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता रेंगेपार येथे इसमाची गळा चिरून हत्या

रेंगेपार येथे इसमाची गळा चिरून हत्या

0
31

सडक अर्जुनी,दि.04ः- तालुक्यातील रेंगेपार येथील बाजारातून घरी परत जात असलेला इसम काल (दि.२) रात्री ८ वाजता मृतावस्थेत आढळला. इसमाच्या गळ्यावर जखमा दिसून आल्याने त्याची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. शामराव आत्माराम ककोळे (५0) माकोशीटोला असे मृताचे नाव आहे.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेंगेपार येथून २00 मीटर अंतरावर असलेल्या मोकाशीटोला येथील शामराव आत्माराम ककोळे हा काल (ता.२) सायंकाळी बाजारासाठी रेंगेपार येथे आला होता. दरम्यान, ७ वाजता सुमारास मोकाशीटोला गावी जाण्यासाठी निघाला असताना तो रस्त्यात मृतावस्थेत पडून होता. येणार्‍या-जाणार्‍यांच्या निदर्शनास येताच पोलिस पाटील मनोहर डोंगरवार यांनी या घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता, मृतक शामराव ककोळे याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे जखमा दिसून आल्या. यावरून अज्ञात इसमांनी त्याची हत्या केली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हत्येचे दिशेने घटनेचा तपास करीत आहेत