सलग तीन वर्ष झाले सुट्टी झाडांच्या संवर्धनासाठी

0
19
शिक्षकांची धडपड ,जत तालुक्यातील प्रेरणादायी उपक्रम ,पालक ग्रामस्त व  विद्यार्थ्यांचेही सहकार्य
सांगली/जत,दि.03 – दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागात पिके व झाडांसाठी तर दूरच ,पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण बनले आहे.अशा परिस्थितीत आसंगीतुर्क केंद्रातील पांडोझरी येथील बाबरवस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे(मुळ गाव बोळेगाव जि.नांदेड )हे सलग तीन  वर्षे  सुटीचा  वेळ देऊन विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पूर्व भागातील पांडोझरी येथे बाबरवस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे.शाळेला जायला कच्चा रस्ता खडखाळ माळरान  येथे मराठी पहीली ते चौथीचे वर्ग आहेत शाळेत ४९ विद्यार्थी आहेत.शाळेच्या आवारात लिंबू ,कडूनिंबू,करंच,चिंच ,नारळ,सिताफळ, गुलमोर,मोरपंखी,चाफा,अशोक जास्वंद,अशीवेगवेळे ६९झाडे लावली आहेत.संध्या उन्हाळी सुटी सुरु आहे.सुटी असतानाही  शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग तीन वर्ष झाले सुटीतही विद्यार्थी व पालक  व ग्रामस्त झाडांना पाणी देण्यासाठी धडपड करत आहेत.झाडांना दररोज सकाळी  पाणी दिले जाते. शिक्षकांसोबत चिमुकली मुले भर उन्हात पाणी देऊन झाडांचे संवर्धन करीत आहेत.यासाठी दर वर्षी प्रमाणे या वर्षी दुंडाप्पा शिवगोंडा कलादगी पांडोझरी/संख लक्ष्मी आॅटो मोबाईल संख या टँकर मालकाने एक खेप मोफत पाणी दिले आहे.परिसरात पाणी विक्री तेजीत सुरु असतानाही,त्यांनी चिमुखल्या मुलांना कँनने पाणी घालताना पाहून त्यांनी स्वतः निर्णय घेवून झाडांसाठी पाण्याचा टँकर मोफत दिला आहे.
शेतकरी मायाप्पा केरुबा गडदे या शेतकऱ्याने सुध्दा  पाण्याची टंचाई असताना मोफत दर महीन्यातून  एक वेळा शेतातील बोरचे पाणी पाईप लाईन करुन  एक तास चरीत सोडून सर्व झाडांना पाणी पाजवतात देतात.
दिलीप वाघमारे दर वर्षी आपल्या सात आठ दिवस गावी जाऊन येतात. आणि या वर्षी पण आठ दिवस गावी जाऊन आले.वेगवेगळ्या उपाययोजना वापरुन झाडे वाचविण्यासाठीअनेक प्रयत्न .करत आसतात. सुटीचा इतर वेळ शाळेसाठी देऊन दररोज सकाळी मुलांसोबत ते झाडांना पाणी देतात .विकास गडदे,अनिल गडदे,नितीन गडदे,हर्षवर्धन मोटे,अधिक मोटे,आस्मिता लोखंडे,वेदीका गडदे,राहुल गडदे,विश्वराज कोरे शैलेश कोरे,अमीर जमखंडीकर,प्रथमेश बाबर,प्रतिक्षा बाबर,अरविंद कांबळे,काखंडकी अर्जुन,प्रदीप मोटे,अश्विनी गडदे,आरती कोरे ,अदीती कोरे, श्रेया वज्रशेट्टी,रुक्मिनी ,काळे मायक्का,क्षमा मोटे.
 शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात ABL,ज्ञानरचनावाद,बोलक्या भिती,ई लर्निग व डिजीटल शाळा ,शालेय वैविध्यपूर्ण उपक्रम ,स्पर्धा परिक्षा व शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन उपक्रम ,शाळा समृद्धी अ श्रेणी साठी केलेले उपक्रम ,शालेय वातावरण ,परिसर अंतरंग व बाह्यांग,दप्तविना शाळा, पाठातर,पाढेपाठातर,१००% उपस्थिती  प्रयत्न चांगला,असे विविध उपक्रम राबविले जातात या शाळेला इतर शाळेतील शिक्षक व पालक भेट देतात
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांनी ही शाळेला भेट दिले.व स्वतः कँनने झाडांना पाणी घातले.
वृक्षलागवडीसह संवर्धन करण्याची गरज
एकेकाळी ग्रामीण भाग वृक्षानी घनदाट  नटलेला असायचा.सर्वच प्रकारची झाडे ग्रामीण भागात असायची  माञ, हळुहळु ग्रामीण भाग देखील आता वृक्ष तोड होत असल्यामुळे उजाड होत चालला आहे.ग्रामीण भागात जर पुन्हा हिरवेगार दृश्य निर्माण करायचे  झाल्यास प्रत्येक कुटुंबाचे शेतात,घरासमोर किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.त्याची निगा राखणे गरजेचे आहे. त्याच वेळी झाडांची संख्या वाढून पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.
दिलीप वाघमारे (सहशिक्षक) जि.प.शाळा बाबरवस्ती(पांडोझरी)
शाळा व्यवस्थापन समितीचेही पाठबळ
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबु मोटे व केंद्र प्रमुख रमेश राठोड,गटशिक्षणाधिकारी जगधने, आर.डी.शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणासाहेब गडदे ,सरपंच सौ.जिजाबाई  कांबळे व उपसरपंच नामदेव पुजारी व माजी सरपंच सौ.सलिमाताई मुल्ला याची साथ आणि पालक मारुती बाबर,तुकाराम कोरे,तुकाराम बाबर,गुलाब गडदे,राजाराम गडदे,प्रकाश बाबर,आप्पासो मोटे,धयाप्पा गडदे, आप्पासो गडदे,माणिक बाबर,नामदेव मोटे,सावंत,गोविंद कोकरे,संतोष बजंञी,वज्रशेट्टी निंगाप्पा,दत्ताञय कोरे,संजय गडदे,तानाजी कोकरे ,अधिक कोकरे, पालकांचे व नागरिक यांचे सहकार्य मिळत आहे.
सर्व स्तरातून या अभिनय उपक्रमाचे कौतुक होत आहे.