34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ नागरिकानी केेले नक्षल्याचे स्मारक उध्दवस्त

नागरिकानी केेले नक्षल्याचे स्मारक उध्दवस्त

0
13

blank

भामरागड,दि.18ः- तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत येणार्‍या तोयनार जंगल परिसरात  १७ जुलै रोजी नक्षल शोधमोहीमेदरम्यान सी-६0 व सीआरपीएफ जवानांनी नक्षल्यांनी निर्माण केलेले स्मारक गावकर्‍यांच्या मदतीने नष्ट केला. या स्मारकावर नक्षल्यांनी मृत झालेल्या नक्षल्यांचे नाव लिहिले होते.
आगामी २८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षल संघटनांच्यावतीने शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी आयोजित या सप्ताहात पूर्व नक्षल्यांव्दारा मारल्या गेलेल्या साथीदारांच्या आठवणीत अनेक ठिकाणी स्मारक उभारण्यात येते. असाच एक स्मारक तोयनार जंगल परिसरात जवानांना आज आढळून आला. पोलिसांनी याची माहिती तत्काळ भामरागडच्या उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांना दिली. अधिकार्‍यांच्या निर्देशाप्रमाणे सी-६0 व सीआरपीएफच्या जवानांनी तोयनार येथील गावकर्‍यांच्या मदतीने स्मारक नष्ट करून तोयनार नाल्यात फेकून दिला. याचदरम्यान जवानांनी शोधमोहीम राबविली. कारवाईदरम्यान कोठी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी शिंदे, महिला पोलिस उपनिरीक्षक कराडे, सीआरपीएफचे पोलिस निरीक्षक परविंद्र यांच्यासह जवान उपस्थित होते.

blank