शेत शिवार कवीता वाचन कार्यक्रमाचे २२ जुलैला आयोजन

0
11

सडक अर्जुनी,दि.18 : तालुक्यातील सौंदड येथे रसिकराज सांस्कृतीक बहुउद्देशीय संस्था नागपूर शाखा गोंदिया जिल्हा व्दारे आयोजित दिवंगत लोककवि नंदकुमार खोब्रागडे येरंडी यांच्या स्मृतीस अर्पण प्राचार्य भा.शि.भोयर विचारमंचावर शेत शिवाराच्या कवीता (कवि संमेलनाचे आयोजन) २२ जुलैला दामोदर नेवारे पशु मत्स विद्यालय सौंदड येथे सकाळी ११.३0 वा. आयोजित केले आहे. कार्यक्रमाचे उद््घाटन सुप्रसिध्द साहित्यीक कवि डॉ.बळवंत भोयर यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिध्द साहित्यीक डॉ.ईश्‍वर नंदपुरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून मुन्नाभाई नंदागवळी, माजी पं.स.सभापती दामोदर नेवारे, गुणेश्‍वर आरीकर, चंद्रकांत लोणारे, मयूर खोब्रागडे उपस्थित राहणारआहेत. तर कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात कविसंमेलन प्रसिध्द कवी रमेश बुरबुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक डॉ.सुरेश खोब्रागडे लाखनी उपस्थित राहणार आहेत. या कवी संमेलनात सहभागी कवी म्हणून नुरजहा पठान,प्रियंका रामटेके, चंदू पाथोडे, अनिल मेर्शाम, सीमा भसारकर, मंगेश जनबंधू, सिध्दांत वालदे, अमरदीप लोखंडे,के.ए.रंगारी, नामदेव कानेकर, मिलिंद रंगारी, बिरला गणवीर, वाय.एस.तागडे, गौतमा राऊत, मंगेश घोडके, अस्मिता मेर्शाम, अजय रामटेके, मनोज बोरकर, शिक्षक तिरपुडे, जनबंधू, भिमानंद मेर्शाम, गणेश सांगोडकर, सुनील मेर्शाम आदी कवी उपस्थित राहणारआहेत. कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश भोते, साधना पातोडे, धम्मदीप मेर्शाम, प्रितम रामटेके, अजय चौरे, निवेश बोरकर, दिपक प्रधान, चेतन नंदागवळी यांनी केले आहे