25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ वैनगंगा नदीपात्रात आत्महत्येसाठी उडी घेणाऱ्या युवकास वाचविले

वैनगंगा नदीपात्रात आत्महत्येसाठी उडी घेणाऱ्या युवकास वाचविले

0
52
भंडारा,दि.31ः- भंडारा शहरा शेजारून वाहणार्या वैनगंगा नदीपात्रात आज सकाळी  ८ वाजेच्या सुमारास एका युवकाने उडी घेत आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याची घटना घडली.त्याचवेळी मात्र  नदीपात्रात  कॅनॉईंग अँड कयाकिंग  चे प्रशिक्षणार्थी  विदयार्थी व  वैनगंगा तैराकी मित्र मंडळाचे युवक तिथे असल्याने त्यांनी लगेच सदर युवकाला पाण्यातून बाहेर काढले.आणि भंडारा पोलीसांना घटनेची माहिती दिली. नदीत उडी घेतलेल्या युवकाचे नाव  रवी रमेश पंचबुद्धे( वय 32) असून शहरातील कोचे गॅस एजसींच्या परिसरातील रहिवासी आहे.
blank