विद्यार्थ्यात स्वच्छतेचे मूल्य -एन.आर. जमईवार यांचे प्रतिपादन

0
16

अर्जुनी मोरगाव ,दि.31 : आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करत असताना एक सक्षम पिढी निर्माण करण्याचे काम करीत आहात. आपले विद्यार्थी हे तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर व्यसनांपासून अलिप्त राहावे. त्यांना आपल्या वैयक्तिक तसेच परिसराची स्वच्छतेविषयीची जाणीव जागृती निर्माण व्हावी, यासाठी स्वच्छतेविषयीचे मूल्य रुजविणे आवश्यक आहे. विद्याथ्र्यांना अध्यापनातून याविषयी नियमित मार्गदर्शन करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार यांनी केले. गटसाधन केंद्र व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने येथील बचत भवनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यातील खासगी व्यवस्थापन व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार तर प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाटे, पं.स. सदस्य जे.के. काळसर्पे हे होते. मुख्य मार्गदर्शक आरोग्य प्रबोधिनी संस्था गडचिरोलीचे डॉ. सूर्यप्रकाश गभणे, आरती पुराम हे होते. तर काशिवार, गेडाम यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दोन सत्रात घेण्यात आली होती. पहिल्या सत्रात सकाळी खासगी व्यवस्थापनाच्या शाळेचे मुख्याध्यापक तर दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी आरती पुराम यांनी सर्व मुख्याध्यापकांना तंबाखू सोडण्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.डी. पातोडे यांनी केले. संचालन सत्यवान शहारे यांनी तर आभार व्ही.जी. मेश्राम यांनी मानले. यशस्वितेसाठी सी.जे. ढोके, यु.एम. पडोळे, टी.एस. रामटेके, सी.एम. मेश्राम, वाय.डी. कापगते, शहारे व गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचा?्यांनी सहकार्य केले.