37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ बागडे भंडाराचे डेप्युटी सीईओ तर भांडारकर गोंदियाचे बीडीओ

बागडे भंडाराचे डेप्युटी सीईओ तर भांडारकर गोंदियाचे बीडीओ

0
31

गोंदिया,दि.31ः- महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने आज गटविकास अधिकारी अ गटातील प्रशासकीय बदल्या केल्या आहेत.त्यामध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांची भंडारा जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या रिक्तपदावर बदली केली आहे.परंतु त्यांच्या जागेवर गोंदिया जिल्हा परिषदेला कुणीच दिलेले नाही.त्याचप्रमाणे सालेकसाचे गटविकास अधिकारी ए.एल.खाडे यांची वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून बदली केली आहे.त्यांच्याही जागेवर कुणाला पाठविण्यात आलेले नाही.आमगावचे गटविकास अधिकारी पाटील यांची पालघर जिल्हा परिषदेत डेप्युटी सीईओ म्हणून बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्हा परिषदेतील मग्रारोहयो विभागाचे जिल्हा उप समन्वयक एन.जे.भांडारकर यांची गोंदिया पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बदली करण्यात आली,मात्र त्यांच्या या बदलीने रिक्त होणार्या जागेवर कुणालाही ग्रामविकास विभागाने न पाठविल्याने जिल्हा परिषदेचा कारभार लंगडा होणार आहे.

blank