माजी खासदार पारधी अनंतात विलीन

0
10

तुमसर,दि.01 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार केशवराव आत्माराम पारधी यांचे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तुमसर येथे निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. त्यांनी भंडारा लोकसभेचे दोनदा, तुमसर विधानसभेचे दोनदा आणि तुमसरचे नगराध्यक्षपदही दोनदा भुषविले होते. ३० जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर तुमसर येथील वैनगंगा किनारी असलेल्या कोष्टी घाटावर अत्यसंस्कार करण्यात आले.
जुन्या काळातील काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटस्थ केशवराव पारधी यांच्या निधनाचे वृत्त कळताच भंडारा-गोंदिङ्मा जिल्ह्यावर शोककळा पसरली. रविवारी दिवसभर त्यांची दिनचर्या व्यवस्थीत होती. सायंकाळी ६.३० वाजता त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यातच हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाला. अत्यंत सामान्य स्थितीत असलेल्या कुटूंबात त्यांचा जन्म झाला होता. काही वर्ष त्यांनी तुमसरचे प्रसिध्द उद्योगपती दुर्गाप्रसाद सराफ यांच्याकडे नोकरी केली होती. मृदभाषी केशवराव पारधी यांनी राजकारणाची सुरुवात तुमसर नगरपरिषदेतून केली होती. नगराध्यक्ष ते आमदार, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता.
आणीबाणीच्या काळात केशवराव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सोबत भक्कमपणे उभे होते. तुमसरात प्रथमच इंदिरा गांधी त्यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. गांधी कुटूंबियांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना दुसèयांदा खासदारकीची तिकीट दिली होती. १९८९ मध्ये त्यांचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. ङ्मावेळी काँग्रेसच्ङ्मा गोंदिङ्मा निवासी एका नेत्ङ्माने विद्रोह केल्ङ्माने त्ङ्मांना पराभव स्विकारावा लागला होता.
केशवराव पारधी यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. दुपारी त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. ङ्कुलांनी सजविलेल्या टड्ढॅक्टरवर त्यांचे पार्थिव ठेवून तुमसर शहरातील मुख्य मार्गाने अंत्ययात्रा कोष्टी घाटावर पोहचली. त्याठिकाणी केशवराव पारधी यांचे सुपुत्र किशोर,रविशंकर व राजेश पारधी यांनी चिताग्नी दिली. खा. मधुकर कुकडे यांचे अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.
यावेळी माजी खा. खुशाल बोपचे, माजी खा. शिशुपाल पटले, आ. चरण वाघमारे, कटंगीचे आमदार टा‘लाल शहारे, माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे, नाना पंचबुध्दे, माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ.हेमंत पटले, माजी आ. अनिल बावनकर, माजी आ. सेवक वाघाये, माजी आ. दिलीप बन्सोड, जिल्हा मध्यवर्र्तेी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागर गणवीर, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, राष्ट्रीङ्म पोवार महासभेचे अध्ङ्मक्ष मुरलीधर टेंभरे, सभापती धनेंद्र तुरकर, जिप सदस्य के.के.पंचबुध्दे, नाराङ्मण तितिरमारे, धनंजय दलाल, अभिषेक कारेमोरे, जिल्हा बँक उपाध्ङ्मक्ष राधेलाल पटले, माजी सभापती पी.जी.क़टरे, गुलाब बोपचे, माजी जि.प. अध्कयक्ष टोलसिह पवार, अमर रगडे,जगदिश येळे,हि.द.कटरे,हिरालाल चौव्हाण,दिलीप पटेल,सी.टी.चौधरी,गोपाल अग्रवाल, कलाम शेख, आदींसह राजकीय क्षेत्रातील तसेच सर्व क्षेत्रातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.