25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ लाल बावटा शेतमजूर धडकले जिल्हा कचेरीवर

लाल बावटा शेतमजूर धडकले जिल्हा कचेरीवर

0
40

गोंदिया,दि.10 : भारतीय शेतमजूर युनियनच्या देशव्यापी आंदोलना अंतर्गत महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन गोंदिया जिल्ह्याच्या वतीने क्रांतिदिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.मोर्चाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी केले. यावेळी डॉ. शेखर कनोजिया, मिलिंद गणवीर, रामचंद पाटील, प्रल्हाद उके,चरणदास भावे, डोमा बावणकर, रायाबाई मारगाये यांनी केले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होेते..