नगरपरिषदेची समाधी बनवून आंदोलन

0
15

भंडारा,दि.10ः- शिवनगरी येथे रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांविरोधात नगर परिषदेची समाधी तयार करून शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.
शिवनगरी येथील मुख्य रस्तावर खड्डे पडलेले असून याबाबत नगरपरिषदेला अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र, आश्‍वासन देऊनही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. या खड्डय़ांमुळे शाळकरी मुले व स्थानिक नागरिकांचा अपघात होऊन जिवितास धोका निर्माण झाला आहे. विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आहे. याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. मात्र, आश्‍वासनापलिकडे काहीही करण्यात आले नाही. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पडलेल्या खड्डय़ांच्या निषेधार्थ नगरपरिषदेची समाधी तयार करण्यात आली तसेच विद्युत खांबाची पूजा करण्यात आली.
यावेळी भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, धनराज साठवणे, पृथ्वीराज तांडेकर,इमरान पटेल, रिजवान काजी, कमलेश बाहे, सचिन गिरीपुंजे, गणेश लिमजे, इरफान पटेल, योगेश बान्ते, भय्याजी बान्ते, लक्ष्मण वानखेडे, टेकचंद बिल्लोरे, प्रा. मारबते,अयुब पटेल, हरिश्‍चन्द्र मेर्शाम, पराग खोब्रागडे, सचिन हुमने, वाल्मीक नान्हे, भुषण भुरे, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवनगरी येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.