28.4 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक 500 गरजू विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण

500 गरजू विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण

0
30

तुमसर,दि.18ः- तालुक्यातील हेल्प युथ फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने  एक पाउल गरजू विद्यार्थी करिता या अभियानातंर्गत स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद शाळा देव्हाडी आणि जिल्हा परिषद शाळा मांढळ येथील 500 गरजू विद्यार्थ्यांना नोटबूकचे वितरण करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आले.यावेळी HYF एनजीओचे अध्यक्ष प्रफुल बाणासूरे,जि. प. देव्हाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.लाडे,कॅरियर लाॅंचरचे संथापक पराग बानासुरे , Hyf चे सचिव विजय बानासुरे ,सदस्य शाम सर,रोशन शहारे ,रोशन कलंबे, मोनू शहारे, उमेश घरडे,अजय फुलबांधे उपस्थित होते.