25.3 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home शैक्षणिक केरळ पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याकरिता रॅलीचे आयोजन

केरळ पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याकरिता रॅलीचे आयोजन

0
32

गोरेगाव दि.०३ :: स्थानिक मॉडेल कॉन्व्हेंट आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्याकरिता गोरेगाव येथे रॅलीचेआयोजन करण्यात आले होते. ही रॅली ठाणा रोड ते तहसील कार्यालय गोरेगावपर्यंत काढण्यात आली. या रॅलीमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले होते. दरम्यान केरळ येथील पुरबळींसाठी निधी गोळा करण्यात आला. तसेच या रॅलीच्या माध्यमातून सहायता निधी जमा करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्यात आले. या रॅलीमध्ये गोरेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी,मॉडेल कॉन्व्हेंटचे संस्थापक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.तसेच आदीलोक विद्यालयाचे प्राचार्य, जगत महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समिती कर्मचारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व गोरेगाव येथील बहुसंख्य नागरीक सहभागी झाले होते.