गुप्ता हे अष्टपैलु व्यक्तिमत्व-जि.प.सदस्य फुंडे

0
15

आमगाव,दि.०३ : मनुष्य जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली वाटचाल कुटुंब व समाजाच्या सानिध्यात करीत असतो. या कालावधीत तो समाजाकडून चांगले, वाईट अनुभव घेत व देत असतो. गुप्ता यांनी सेवेदरम्यान शिक्षक ते वेंफ्द्रप्रमुख व शिक्षक समितीच्या तालुका ते जिल्हास्तरावरील विविध पदावर राहून त्यांनी इमाने इतबारे सेवा दिली. ते हसतमुख, हजरजवाबी, व मनमिळावू व्यक्ती असून ते अष्टपैलु व्यक्तीमत्वाचे धनी असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य सुखराम फुंडे यांनी केले.
सेवानिवृत्तीपर केंद्रप्रमुख डी.एल.गुप्ता यांना निरोप देण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य फुंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतनचे प्राचार्य कमलबापू बहेकार होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य छन्नुताई उके, गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, शिक्षण विस्तार अधिकारी राजकुमार रामटेके, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, जिल्हा सरचिटणीस एल.यु.खोब्रागडे, पी.आर.पारधी, सुभाषचंद्र गुप्ता, वाय.एस.तागडे, प्रकाश श्यामवुंफ्वर,सी.पी.बिसेन, संतोष पटले, बी.सी.ठाकरे,के.डी.रामटेके, सल्लागार समितीचे सदस्य आसाराम भांडारकर, प्राचार्य अनिल मुरकुटे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान विद्या निकेतन याप्रसंगी केंद्रातील जि.प.,खासगी अनुदानित व खासगी विना अनुदानित शाळेचे सर्व शिक्षकांच्या वतीने तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भारती, शिक्षक संघ, सल्लागार समिती,गटसाधन वेंफ्द्र आदि संघटनांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सेवा निवृत्तीपर वेंफ्द्रप्रमुख डी.एल.गुप्ता व त्यांच्य पत्नी सौ.साधना गुप्ता यांचा सत्पनीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी वेंफ्द्राच्या वतीने शिक्षिका सौ.वर्षा बावनथडे,गटशिक्षणाधिकारी भोयर, प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मनोज दिक्षीत, एल.यु.खोब्रागडे, प्रकाश ब्राम्हणकर, डी.टी.कावळे, राजेश लदरे, किशोर डोंगरेवार, एन.बी.बिसेन, वशिष्अ खोब्रागडे, रहांगडाले, संदिप तिडके, सुभाषचंद्र गुप्ता, माजी सरपंच पी.के.चौधरी, झामरे, कमलबापू बहेकार आदिंनी केंद्रप्रमुख गुप्ता यांच्या कार्यावर प्रकाश टाकून पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन समितीचे तालुकाध्यक्ष डी.व्ही.बहेकार यांनी तर आभार विकास लंजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष मेश्रम, सुरेश कश्यप, दिनेश रहांगडाले, एम.जी.मेंढे, संदिप मेश्राम, अनिल टेंभुर्णीकर, उर्मिला गुप्ता, भरतलाल ताजणे, मंदा कापसे, सुरेश कटरे, डी.आय.खोब्रागडे आदिंसह शिक्षक, शिक्षक समितीचे पदाधिकाèयांनी सहकार्य केले.