37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home शैक्षणिक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेमार्फत सत्कार

0
26

blank

जत(सांगली),दि.06ः- सांगली जिल्ह्यातील जत तालुकांतर्गत येत असलेल्या  जिल्हा परिषद केंद्र शाळा सनमडी येथे  शिक्षक दिनानिमित्त सहारा ग्रुप संस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना तालुका जतच्यावतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मच्छिन्नद्र ऐनापुरे (केंद्र-जिरग्याल), सिद्धेश्वर कोरे(केंद्र-जदरबोबलाद),प्रकाश माळी(केंद्र-गुडडापूर),भाऊसाहेब महानूर (केंद्र-डफळापूर),प्रल्हाद हुवाळे(केंद्र-सनमडी) यांचा सत्कार पुस्तके ,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गावचे सरपंच रुक्मिणी पवार, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष-तमन्ना कर्ले,तंटामुक्ती अध्यक्ष -महादेव सलगर, राष्ट्रपती पदकप्राप्त ऑर्डनरी कॅप्टन-उमाजी महानोर जिल्हा उपाध्यक्ष मलेशपा कांबळे, तालुका अध्यक्ष-सुनील सूर्यवंशी, साहित्यिक -अनिल मिसाळ ,संतोष काटे इत्यादी उपस्थित होते. दिलीप साळुंखे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.संजय कोळी यांनी प्रास्ताविक केले .कार्यक्रमाचे नियोजन प्राणिशा गुरव मॅडम यांनी केले.राकेश वसावे यांनी आभार मानले

blank