24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home गुन्हेवार्ता आश्रमशाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी लाच घेणारा गजाआड

आश्रमशाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी लाच घेणारा गजाआड

0
26

गडचिरोली,दि.15ः जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा हलेवारा येथील मुख्याध्यापक लोमेश हिरामण बारसागडेला 9 हजार 600 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून रंगेहाथ पकडले.तक्रारकर्ताच्या मुलीचा तसेच भावाचा शाळा सोडल्याचा दाखला हवा होता.त्यासाठी त्याच्याकडे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांने 9600 हजाराची लाच मागितली होती.तक्रारकर्त्य्ाला लाच देण्याची ईच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली.त्या आधारे आज 15 सप्टेंबरला चौकशी करण्यात आली असता लाच स्विकारण्याची तयारी दर्शवित रक्कम स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानदेव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक रवी राजुलवार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.