अपयशातून यश शोधण्याचा मार्ग काढावा : जयाकिशोरी

0
15

गोंदिया,दि.16ः-मानवी जीवन वारंवार प्राप्त होत नाही, जीवनात यश आणि अपयश या दोन्ही बाजू संघर्षशिल जीवनातील आहेत. मात्र अपयशाला खचून न जाता यशस्वी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने संघर्ष करावे, संघर्षानंतर निश्‍चितपणे यश प्राप्तच होतो. म्हणून शेतकरी बंधू असो की, सर्वसामान्य नागरिकाने अपयशाला आत्महत्येचा पयार्याची साथ न देता अपयशातून यश शोधण्याचा मार्ग काढावा, असा मोलाचा सल्ला जयाकिशोरी यांनी दिले.
यानिमित्त त्यांनी स्थानिक नमाद विद्यालयाच्या सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. याप्रसंगी त्या म्हणाल्या, मी वयाच्या ६ वषार्पासून भजन आणि कथापाठ करते. ‘नानीबाई का मायरा’ या कथापाठने मला चालना मिळाली. त्यानंतर श्रीमद् भागवत कथा व प्रोत्साहनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याची संधीही प्राप्त होत असते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवक-युवती आणि नागरिकांचा वैचारिक दृष्टीकोनाला दिशा देण्याचे कामही आपल्या माध्यमातून होत आहे. हे मला समाधानी वाटत आहे.त्या म्हणाल्या, भारत देशात माध्यम हा स्तंभ आहे. माध्यमांच्या माध्यमातून एकाच वेळी, एकाच ठिकाणी सर्व घटनाक्रम आपल्यापयर्ंत पोहोचविले जातात. म्हणून माध्यमांची भूमिकाही तेवढीच महत्वाची आहे.हुंडा पध्दत, स्त्रीभ्रृण हत्या यासंदर्भातही समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने आपण प्रवचनाच्या माध्यमातून जनजागृतीही करीत आहोत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार राजेंद्र जैन उपस्थित होते.