24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home राजकीय लोकसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

लोकसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

0
31
  • नागपूर,,दि.06- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चाचपणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे १७ ऑक्टोबर नंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात नागपूर सह काही जिल्ह्यामध्ये बैठका घेणार आहेत. किमान तीन दिवसांचा हा दौरा राहणार आहे.मनसे काही मतदार संघात उमेदवार देऊ शकेल काय? याचीही चाचपणी या निमित्ताने करणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मनसेला स्थान द्यायचे की नाही, यावर सध्या आघाडीत चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मनसे साठी आग्रही असल्याचे मानले जाते. तर काँग्रेस त्यासाठी फारसी उत्सुक नाही. मनसेलाही आघाडीबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यादृष्टीने ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
You Might Also Like