सिने पद्धतीने पकडली चोरांची टोळी – ५ लोकांना पोलीस कोठडी
गोंदिया,दि.23ः- वन विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य उपविभाग सालेकसा मार्फत १५ ऑक्टोबर च्या रात्री विभागाचे अधिकारी कक्ष क्र. ४६६ आणि ४६७ मध्ये पाहणी करण्याकरिता गेले असता त्यांना अज्ञात लोकांकडून वृक्षांची कत्तल करताना आढळले. प्रकार असे कि विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पाहणी करण्या करिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू गेली असता काही इसम झाडांची कत्तल करताना आढळले. मात्र ह्या आधी सुद्धा असेच वृक्षतोड आढळून आले होते मात्र अधिकारी आले असल्याचा काळतच पळ काढून जंगलात पळून गेले होते मात्र ह्या वेळेस त्यांना पकडण्यासाठी शक्कल लढवली गेली. जंगलात त्यांची टोळीतील किती सदस्य आहेत ह्याची माहिती नसल्याने त्यांच्यावर दबा धरून राहिल्याने अंदाज लागला कि एकूण चार इसम असून त्यापैकी २ झाड कापण्याचे तर एक त्यांच्यावर निगराणी ठेवत चौफेर नजर ठेवायचे तर एक मुख्य रस्त्यावर राहुन फोन द्वारे बाहेरचे हालचाली साथीदारांना सांगण्याचे काम करत असल्याचे कळले. विभागाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चमूने रांगत रांगत झाडे कपणाऱ्याच्या जेवढ्या जवळ जाता येईल शक्यतो प्रयत्न केले. त्यांच्या वेगवेगळ्या बाजूने घेरून हळुवारपणे कुठलीही हालचाल न करता नजीक पोचताच धाव घेऊन रंगेहाथ पकडण्यात आले. झाडे कपणाऱ्यांकडून झाड कापण्याची मोठी आरी आणि कापलेले सागवन जप्त करण्यात आली. एखाद्या सिनेमातील थरारक दृश्या सारख सापडा रचत त्या चारही आरोपीना अटक करण्यात आली. त्याची चौकशी केले असता कळले कि त्यांनी आधीच दोन झाडं कापले होते आणि हे तिसरे झाड कापत असताना महामंडळाच्या अधिकाऱ्यांची त्यांना ताब्यात घेतले. हि घटना वनजमीन कक्ष क्र . ४६७ मध्ये घडली असून चोर कक्ष क्र. ४६६ पकडण्यात आले. पकडलेल्या आरोपींमध्ये संजय लखन तुमसरे, विजय कवडू तुमसरे, देवराम हरिचंद फुंडे आणि भैयालाल यादोराव सलाम ह्यांचा समावेश आहे. सर्व आरोपी सुरजाटोला चे रहिवासी असून त्यांनी सर्व चोरीचा साहित्य जोशीटोला येथे राहणारे भास्कर मेश्राम ह्यांना विकल्याचे आरोपींनी माहिती दिली. सविस्तर माहिती घेताना असे लक्षात आले कि त्याचे हे काम पूर्ण वर्षभर सुरु असतो आणि रोज असे झाडांचे कत्तल करण्याचे काम नित्यनेमाने होत होते. झाडे कापण्याची आरी हि ने आन न करता जंगलातच लपवून ठेवली जात असे म्हणजे वारंवार नेआण करताना कोणी बघण्याची भीतीच नाही. दररोज किंवा सोयीनुसार, ३ ते ४ झाडे कापून त्यातील मुख्य बुंध्याचे तिथेच सिलपाट तयार करून घेतले जात असे आणि इतर झाडाचे भाग तिथेच फेकून दिले जाते अशी माहिती आरोपींनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच हा सर्व चोरीचा साहित्य कुठे विकला जातो ह्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली. दिलेल्या माहिती नुसार सदर कार्यवाही उशिरा रात्रीपर्यंत सुरु होती त्यामुळे त्यांना चौकशी करून सोडून दिले गेले आणि १६ तारखेला सकाळपासून संबंधित ठिकाणी नेवून कापलेले वृक्ष आणि हत्यार जप्त करण्यात आले. पंचनामा करून आरपींना भारतीय वन अधिनियम अनुसार रात्रीच्या काळात केलेल्या वृक्षतोडीसाठी दुप्पट शिक्षेचे प्रावधान असल्याने तसेच केलेल्या गुन्हा हा अजामीनपात्र असल्याने तात्काळ आमगाव न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच चोरीचा साहित्य जप्त करण्यासाठी जोशीटोला येथील भास्कर मेश्राम ह्यांच्या घरी झडती घेतली असता चोरीचा वन उपज व चोरीच्या लाकडांना टिम्बर मध्ये परावर्तित करण्यासाठीचे मशीन साठे जप्त करण्यात आले. तसेच भास्कर ह्यांची चौकशी करून सदर प्रकरणाची कबुली त्यांनी दिल्यावर त्यांना सोडण्यात आले होते मात्र ते पण ह्या गुन्ह्यात साधीदार असल्याचे निश्चित होताच २० ऑक्टोबर रोजी त्यांचा घरून अटक करण्यात आली असून आमगाव न्यायालयातून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आरोपींवर भांदवि कलम 34, 149, 379, 411, 413 तर भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६(१) ई आणि फ तसेच ४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कार्यवाही विभागीय व्यवस्थापक एस टी मेश्राम ह्यांच मार्गदर्शनात, वनपरिक्षेत्र अधिकारी एस एच पिंजारी, कुलदीप शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक श्री ओझकरकर,वनपाल रेवननाथ रोटे, मदन मडावी, गणेश बारापात्रे, प्रेमकुमार रंगारी, वनरक्षक चेतन धोमने, दत्तात्रय गायकवाड, गुरुनाथ शिनगारे, आकाश राऊत, प्रज्ञा हुमने, वनमाला आगोशे, शिलकराम मडावी, तिलक मडावी, पुनाराम कटरे, चरण ठाकरे, भावराव ठाकरे, जुगलकिशोर रहांगडाले, रमेश तुपटे व वाहन चालक प्रफुल्ल चिंचखेडे ह्यानी केली.





