गोंदिया,दि.23 : आगामी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडूण जिल्हा प्रशासनाला प्राप्त ईव्हीएम मशीन एम 3 च्या प्रथम स्तरीय तपासणी आज दि. 23 ऑक्टोबर 2018 पासून नविन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक येथे सकाळी 10 वा. सूरु होणार आहे. सदर तपासणी 1594 कंटोÒल युनिट व 2741 बॅलेट युनिटवर आगामी 10 ते 15 दिवस चालणार आहे. करीता जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सर्व पक्षाचे प्रतिनिधी यांना ईव्हीएम मशीन एम 3 च्या तपासणीच्या वेळेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





