महिला पोलिसांशी हुज्जत घालनाऱ्यांवर गुन्हा दाखल

0
8

* पहिल्याच दिवशी 50000 चा दंड वसूल
गोंदिया,दि.23 : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. 15 ऑक्टोबर पासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु नागरिकांना हेल्मेट खरेदी आणि वापराची सवय लागावी. याकरिता 21 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली होती. सोमवारी शहराच्या बाहेर विना हेल्मेट असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. आज जिल्ह्यात 100 वाहांचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कारंजा येथील टी पॉइंटवर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात होते. दरम्यान एम एच 35, एएस 8254 या दुचाकीवर असलेल्या दोघांना महिला वाहतूक पोलिसाने हात देऊन थांबविले. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या निर्देशयाप्रमाणे कारवाई करत असताना वाहन चालक आणि मागे बसलेल्या दोघांनी महिला कर्मचाऱ्याशी वाद घातला. अंगावर चालून गेले. या प्रकरणी त्या दोघांविरोधात गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ते दोघेही सडक अर्जुनी तालुक्यातील कणेरी या गावचे असल्याचे समजते.