गोंदिया,दि.३१ : : शासन धोरणाच्या विरोधात आयोजित २ नोव्हेंबरच्या राज्यव्यापी शाळा, महाविद्यालय बंद आंदोलनाला गोंदिया जिल्हा शैक्षणिक संस्था संचालक मंडळाने पाqठबा जाहीर करीत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन केले आहे. शाळा संस्था चालकांनी या संदर्भातील आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाला आंदोलनापुर्वी जिल्हाधिकारीमार्फत सादर केले आहे.
शिक्षणापापासून कोणीही वंचित राहू नये सर्वांना शिक्षण मिळावे या ध्येयाने जिथे सरकारी यंत्रणा पोहचू शकत नाही. त्या ठिकाणी शासनाच्या आवाहनानुसार खाजगी शिक्षण संस्थांनी शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी याकरिता पुढाकार घेतला आहे. गावोगावी, वस्ती, डोंगरी, आदिवासी झोपडपट्टी अशा सर्व ठिकाणी खाजगी शिक्षण संस्था मार्फत शाळा सुरु करण्यात आल्या. या शिक्षण संस्थेनी स्वत:ची निधी खर्च करुन सर्व भौतिक सुविधा या शाळांना उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळे गोर-गरीब व सर्व सामान्य विद्याथ्र्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मागील ५० वर्षापासून खाजगी शिक्षण संस्था काम करीत असून देखील त्याच्या योगदानाचा शासनाला विसर पडला असून या शिक्षण संस्था बंद करण्याचा डाव रचला आहे.
खाजगी शिक्षण संस्थांना शासनाच्या या धोरणामुळे होत असलेल्या त्रास दूर करण्याकरिता शिक्षणावर होत असलेला खर्च बोझा न समझता शिक्षणावर खर्च वाढविण्यात यावा, शिक्षकांवर अमानुष लाठीचार्ज करुन दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, २० टक्के अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान देण्यात यावे, ३१ ऑक्टोबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, सातवा वेतन आयोग लागू करणे, अनेक वर्षापासून जाहिर होत नसलेल्या शिक्षकेत्तर आकृतीबंध जाहीर करणे या मागण्यांना घेऊन २ नोव्हेंबरला शाळा बंद आंदोलन आयोजित करण्यात आले. या बाबतचे निवेदन माजी आमदार रामरतन राऊत, जयेशभाई पटेल, गंगाधर परशुरामकर, मंडळाचे सचिव केतन तुरकर, गजेन्द्र फुंडे, विनय काथवटे, वाय.टी. रहांगडाले, किशोर कोरे, मधुसूदन दोनोडे, पंकज शर्मा, वाय.वाय. रहांगडाले, हर्षल कापगते, त्रिलोचनqसग भाटीया, देवेंद्रqसह मच्छिरके, धनराज हुकरे, समीर बैस, राजु मेश्राम, दिनेश टेंभरे, रिंकू भोयर, महेंद्र मेश्राम, दुर्गाप्रसाद पटले, महेंद्र देशमुख आदिंनी सादर केले. तसेच जिल्ह्यातील सर्व खाजगी शैक्षणिक संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र जैन यांनी शाळा बंद आंदोलनाला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.





