32.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home विदर्भ तुमसर नगर परिषद तर्फे ४२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

तुमसर नगर परिषद तर्फे ४२ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन

0
39

तुमसर,दि. १७ : नगर परिषद अंतर्गत विविध योजनेतून ४२ कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन नगर परिषदेच्या प्रांगणात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. शहराला नियमित २४ तास पाणी पुरवठा व्हावे म्हणून नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाभियान अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेतून ३७ कोटी रुपये व प्रशासकीय इमारतीकरिता ९६ लक्ष रुपये असे एकूण ४२ कोटी रुपयांचे कामे शासनाकडून खेचून आणले. त्या कामाचा भूमिपूजन सोहळा पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाला खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, मुख्याधिकारी अर्चना मेंढे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपाध्यक्ष कांचन कोडवाणी, गीता कोंडेवार, अमर रगडे, सह विविध विभागाचे सभापती, कर्मचारी वर्ग तथा नगर परिषद सदस्य उपस्थित होते.