25.7 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home विदर्भ विशाल हृदय रोग व मुलांचे दंत रोग शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबरला

विशाल हृदय रोग व मुलांचे दंत रोग शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबरला

0
27

गोंदिया, दि. २२ ::- गोंदिया जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ व वॉकहार्ट हॉस्पिटल नागपुर व्दारा आयोजीत विशाल ह्रदय रोग शिविर व लहान मुलांचे दंत रोग शिबिराचे आयोजन २७ नोव्हेंबर मंगळवार ला प्रोमो शिक्षा भवन आलु गोदाम जवळ कुडवा नाका, गोंदिया येथे आयोजीत करण्यात आले आहे. या शिबिरात नि:शुल्क ईसीजी, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, व हृदयाशी संबंधीत आजारांवर वॉकहार्ट हॉस्पीटल व्दारे मार्गदशर्न करण्यात येणार आहे. आजार असणा-या रूग्णांना २८ नोव्हेंबरला वॉकहॉर्ट हॉस्पीटलचे हृदय रोग विभाग प्रमुख वरिष्ठ हृदयरोग चिकित्सक डॉ. दिलीप रत्नानी व्दारे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच गोंदिया क्षेत्रातील पहिले लहान मुलांचे दंत रोग विषेशज्ञ डॉ. अक्षत अग्रवाल यांच्याव्दारे दाताचे विकार असणा-या लहान मुलांचे तपासणी करून उपचार व मार्गदर्शन कण्यात येणार आहे. या शिबिराला जास्तीत जास्त संबंधीत रूग्णांनी हजेरी लावुन लाभ घेण्याचे आव्हान गोंदिया जिल्हा वृत्तपत्र संघाचे मार्गदर्शक दिनेश उके यांनी केले आहे.