24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता वसतिगृह अधीक्षकाची आत्महत्या

वसतिगृह अधीक्षकाची आत्महत्या

0
24

मूल , दि.23 : : येथील कर्मवीर वसतिगृहाच्या अधीक्षकाने घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज, शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश येरमे (वय 30) असे मृताचे नाव आहे. शिक्षण प्रसारक मंडळद्वारा येथे कर्मवीर वसतिगृह चालविले जाते. सिंदेवाही तालुक्‍यातील गोविंदपूर येथील प्रवीण येरमे हा वसतिगृहात अधीक्षक म्हणून कार्यरत होता. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. आज सायंकाळी त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. कौटुंबिक कलहातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.