23.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ शहरातील अतिक्रमणधारकांना तत्काळ पट्टे द्या-आ.रहागंडाले

शहरातील अतिक्रमणधारकांना तत्काळ पट्टे द्या-आ.रहागंडाले

0
33

तिरोडा,दि.०६ः-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात येणाèया तिर्थक्षेत्र पोंगेझèयाच्या ठिकाणी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच तिरोडा येथील महात्मा फुले वार्डातील अतिक्रमणधारकांना तत्काळ पट्टे देण्याची प्रकिया सुरु करण्यासंबधीच्या सुचना आमदार विजय रहागंडाले यांनी दिले.ते जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारसंघातील विविध योजना व विकास कामांचा आढावा सभेत बोलत होते.जिल्हा पर्यटन निधीतून पोंगेझरा येथील रस्ते,शौचालय,स्नानगृहाचे बांधकाम करण्यात यावे.वन्यजीव विभागाने कामे करीत असताना अडथळा आणू नये यावरही चर्चा करण्यात आली.तिरोडा तालुक्यातील बेरडीपार येथील लोहझरी तलावाकरीता अधिग्रहीत करण्यात आलेल्या जमिनीवर तलाव तयार झालेला नाही.मात्र आजही सातबारावर अधिग्रहीत असे लिहिले असल्याने शेतकरी वर्गाला ती जमीन खरेदी विक्री करताना अडचण निर्माण होत असल्याने अधिग्रहणाची नोंद कमी करणे,गेल्या ५० वर्षापासून असलेले महात्मा फुले वार्डातील अतिक्रमण नियमित करणे,तिरोडा पोलीस स्टेशन व उपविभागीय अधिकारी कार्यालयाकरीता २ कोटी ६१ लाख रुपयाचा निधी मंजुर झालेले आहे त्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.बैठकिला जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे,निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक,सहा.वनसरंक्षक शेंडे,,उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपदे,तहसिलदार कल्याणकुमार डहाट,मुख्याधिकारी विजय देशमुख,पोलीस निरिक्षक कैलास गवते आदी उपस्थित होते.

 

blank