आदिवासी समाजाचा परिचय मेळावा २३ डिसेंबर रोजी

0
12

गोंदिया,दि.07 : गोंडवाना मित्र मंडळ, जिल्हा गोंदियाच्यावतीने आदिवासी उपवर-वधू पचिय मेळावा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २३ डिसेंबर रोजी गुर्जर क्षत्रिय समाजवाडी गोंदिया येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद््घाटन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आदिवासी समाजसेवक डॉ. एन. डी. किरसान यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून प्रा. राजकुमार हिवारे, दीपक बहेकार, सतीश पेंदाम, इंजि. रोडगे, सुरेश पेंदाम, सेवानवृत्त न्यायाधीश प्रकाश धुर्वे, जिल्हा शल्यचिकित्सक प्रमोद खंडाते, तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, घनश्याम तोडसाम, प्रीतमसिंग कोडापे, तहसीलदार नवृत्ती उईके उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते खासदार मधुकर कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल,जिप अध्यक्षा सीमा मडावी, माजी आ. राजेंद्र जैन,मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला समाजबांधवांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.