25 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ विनोद चौधरी यांचा विदर्भ समाज गौरव पुरस्काराने सत्कार

विनोद चौधरी यांचा विदर्भ समाज गौरव पुरस्काराने सत्कार

0
32

गोदिंया,दि.13: कुठ गेल्या चळवळी आणि आमचे लोकः सारे पोट भरती बिल्ली आणि बोकः मुन्नाभाई नंदागवळी यांच्या कवितेने कविसंमेलनाला वैचारिक रंग चढवला. आणि हे कविसंमेलन जबरदस्त रंगले.विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटना गोदिंया जिल्हा यांच्यावतीने येथील भवभूती रंगमंदिरात सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते यांच्या सत्कार व कविसंमेलनाचे आयोजन रविवारला करण्यात आले होते. विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटनेच्यावतीने आयोजित अधिवेशनात जिल्हा परिषदेचे सांख्यिकी विस्तार अधिकारी विनोद चौधरी यांना विदर्भ समाज गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
गोंदिया विधानसभा मतदार सांघाचे आमदार गोपालदास अग्रवाल, भाजपचे नेते विनोद अग्रवाल, रतन वासनिक, मुणेश रहांगडाले, प्रसिद्ध कवि प्रा. युवराज गंगाराम, मानिक गेडाम, मनोज बोरकर, मुन्नाभाई नंदागवळी, के ए रंगारी, केवलराम उके, मिलिंद रंगारी, शिक्षक अंबादे, निखिलेस यादव, छगन पंचे, वाय पी मेश्राम, शशि तिवारी, सुरेंद्र जगने, चैतन्य मातुरकर, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चौधरी यांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी सर्व कविंचे सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आलाप्रस्ताविक मिलिंद मेश्राम यांनी करुन संचालन रमेश शर्मा यांनी केले.

blank