दिव्यांगांची वैद्यकीय महाविद्यालयावर धडक

0
10

गोंदिया,दि.13ःःदिव्यांग प्रमाणपत्र सुलभतेने उपलब्ध व्हावे तसेच दिव्यांग्यांचा विविध समस्यांना घेऊन अपंग कल्याणकारी संघटनेच्या नेतृत्वात जिल्ह्यातील शेकडो दिव्यांग बांधवांनी बुधवारी १२ डिसेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर धडक दिली. दरम्यान मागण्यांचे निवेदन वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आले.
शासन दिव्यांग्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवित असली तरी, जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र सुलभतेने उपलब्ध होत नसल्याने दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळविताना अनेक बाबींचा त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात दिव्यांग्यांच्या संघटनेने वेळोवेळी संबंधितांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नसल्याने अपंग कल्याणकारी संघटनेने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, १२ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील शेकडो दिव्यांगांनी जयस्तंभ चौकातून मोर्चा काढून वैद्यकीय महाविद्यालयावर धडक दिली.
दरम्यान, दिव्यांगाचे प्रमाणपत्र १५ दिवसात देणे, तपासनी झाल्याची पोच देण्यात यावी, तयार झालेले व फेटाळलेल्या प्रमाणपत्राची यादी संबंधित कार्यालयात लागण्यात यावी, ओपीडीमध्ये दिव्यांगांची स्वतंत्र रांगेची व्यवस्था करावी, जिल्हा सामान्य रुग्णालयात आयक्यू व बेरा तपासणीची व्यवस्था करणे, बहुविकलांगांकरीता व्हिलचेअरची व्यवस्था करणे, दिव्यांगाच्या स्वतंत्र ओपीडीतील कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवून तज्ञ डॉक्टरांचे कक्ष तळमजल्यावर नाव व सेवेसह उपलब्ध करावे, जुने प्रमाणपत्र व एसएडीएम अंतर्गत प्राप्त प्रमाणपत्रातील तफावतीमुळे रद्द झालेले प्रमाणपत्राचे पुर्नतपासणी करुन दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात यावे, दिव्यांगांना नि:शुल्क ओपीडी देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातां श्रीमती दुधलकर यांना देण्यात आले.
यावेळी त्यांनी दिव्यांग्याच्या तीन मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे व उर्वरित मागण्या १५ दिवसात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले. दरम्यान दिव्यांग्याच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या पदाधिकाड्ढयांनी दिला आहे.