25.5 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home राजकीय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष नाईक बुधवारला गोंदियात

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष नाईक बुधवारला गोंदियात

0
32
गोंदिया,दि.20ः- महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष संजय नाईक हे 26 डिसेंबरपासून गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जिल्ह्यात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी दिली. 26 डिसेंबर रोजी वाहतूक सेनेचे राज्य अध्यक्ष संजय भाई नाईक, पक्षाचे सरचिटणीस हेमंत गडकरी हे जिल्ह्यातील मनसे सैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. वाहतूक सेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून ते थेट आमगाव येथील वाहतूक सेनेच्या शाखेचे उद्घाटन करणार आहेत. तसेच सालेकसा येथील मनसे फलकाचे अनावरण करून सालेकसा येथे वाहतूक सेनेची स्थापना करणार अशी माहिती जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांनी गोंदिया येथे झालेल्या बैठकीत दिली. तसेच सर्व मनसे सैनिकांना 26 डिसेंबर रोजी शासकीय विश्राम गृह गोंदिया येथे होणाऱ्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
नाईक यांच्या आगमनपुर्व 19 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीला अध्यक्ष मनीष चौरागडे, उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मुन्ना गवली, गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, सालेकसा तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे, सालेकसा शहर अध्यक्ष राहुल हटवार विद्यार्थी सेनेचे क्षितिज वैद्य व इतर मनसैनिक उपस्थित होते.