25.2 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू – दोघे जखमी

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू – दोघे जखमी

0
25

गोरेगाव,दि.21: दुचाकीला अपघात होऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू तर दोघेजण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील गौरीटोला परिसरात गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली . दिनदयाल शहारे(वय 40) इंदिरा नगर तिल्ली मोहगाव असे अपघातातील मृतकाचे नाव असून संतोष ग्यानिराम भोंडे( 31), लखन प्रभुदास साखरे( 36) अशी जखमींची नावे आहेत
सविस्तर वृत्त असे की मृतक व दोघे जखमी दुचाकीने भरधाव वेगात चोपा कडून स्वगावी परत जात असताना दुचाकी चालक लखन साखरे याच्या वाहनावरून नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेवर असलेल्या पळसाच्या झाडाला दुचाकीची धडक बसली. ज्यामध्ये दिनदयाल याचा जागीच मृत्यू झाला. तर लखन व संतोष दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेने दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय गोरेगाव व त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे दाखल करण्यात आले आहे घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले पुढील तपास गोरेगाव पोलीस करीत आहेत