एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन

0
12
अर्जुनी मोर,दि.२१ः तालुक्यातील झरापडा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतर्फे आयोजित महिला मेळाव्याचे उदघाटन प.स.सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या मंदाताई कुंभरे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंचा कुंदाताई  डोंगरवार,उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे,प्रमुख मार्गदर्शक गजानन डोंगरवार,होमराज ठाकरे,माजी सरपंचा तानुरेसा रामटेके,पो.प.संतोष डोंगरवर,तमूस अध्यक्ष भैयालाल मेश्राम,मीना लांजे सारपंचा बोलदे,ग्रामविकास अधिकारी साखरे  उपस्थित होते.प्रस्ताविक स्मिता राऊत यांनी केले. मार्गदर्शक गजानन डोंगरवर व होमराज ठाकरे यांनी महिलांना मिळालेल्या अरक्षणाबद्दल माहिती दिली आणि आपल्या उदघाटकीय भाषणातून महिलांनी पैशाची बचत करणे हेच आपले मुख्य ध्येय समजून कार्य करावे.माहिलंबद्दलच्या अनेक मिळणाऱ्या पंचायत समितीच्या योजनाबद्दल शिवणकर यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन पर्यवेकधिका विणा वैद्य,तर आभार मंगला शहरे अंगणवाडी सेविका अर्जुनी मोर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगला लांडेकर गीता राऊत अ. से.झारापडा,हार्धा दहिवाले,प्रियांका मेश्राम,मदनिस यांचें योगदान लाभले व समस्त झरपदा ग्रामवासीयांनी या मेळाव्यात आपली उपस्थिती दर्शविली.