29.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाणांचे नागपूरात जंगी स्वागत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.चव्हाणांचे नागपूरात जंगी स्वागत

0
23

blank

नागपूर-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्चीत प्रदेशाध्यक्ष , माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज नागपूर शहरात प्रथम आगमन झाल्यानंतर शहर काँग्रेस कमिटी तर्फे जंगी स्वागत करण्यात आले.विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यासंह सवर्च नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विमानतळावरुन त्यांची मिरवणुक काढत काँग्रेस देवडिया भवनात स्वागत करण्यात आले.त्याठिकाणी आयोजित कायर्क्रमात खा.चव्हाण यांनी पक्षाला बळकट करण्यासाठी मतभेद विसरुन कामाला लागण्याचे आवाहन केले.चव्हाण यांनी येणाया प्रत्येक निवडणुकीत पक्षाला यश कसे मिळेल यावर भर देण्याचे आवाहन केले.यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार ,माजी आमदार नितिन राऊत,सतिश चुतेवर्देी,विकास ठाकरे यांंच्यासह काँग्रेसचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य,प्रदेश व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

blank