जैन मुनिश्रींनी केला देहत्याग, पद्मासन पालखीला लोटला जनसागर

0
9

सागर- आचार्य विद्यासागर महाराज यांचे शिष्य आणि दिगंबर जैन समाजातील अनमोल रत्न मुनिश्री क्षमासागर यांनी शुक्रवारी (13 मार्च) देहत्याग केला. ते 58 वर्षांचे होते. मुनिश्रींची शहरातून पद्मासन पालखी निघाली. यावेळी हजारोंच्या संख्येने जैन अनुयायी सहगाभी झाले.उल्लेखनिय म्हणजे मुनिश्रींचा जन्म बडाबाजार भागात झाला होता. त्याचप्रमाणे मुनिश्रींनी बडाबाजारातील वर्णी भवनात देहत्याग केला. मुनिश्री संन्यास घेतल्यापासून वर्णी भवन मोराजी येथेच होते. छोटा करीला येथील शेतात मुनिश्रींना भावपूर्ण वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला.
मुनिश्री क्षमासागर महाराजांचा वर्षाकालीन चातुर्मास यंदा पंतनगरातील उदासीन आश्रमात झाला होता. चातुर्मासाच्या समाप्तीला खुद्द मुनिश्री उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून मुनिश्री अस्वस्थ होते. तरीदेखील त्यांनी साधना निरंतर सुरु ठेवली होती. मागील चार दिवसांपासून मुनिश्री यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला होता. शुक्रवारी सकाळी पाच वाजेदरम्यान मुनिश्रींनी अंतिम श्वास घेतला.