31 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ पक्षाच्या कार्यक्रमातून जनजनपर्यंत पोहचावे : तारीक कुरेशी

पक्षाच्या कार्यक्रमातून जनजनपर्यंत पोहचावे : तारीक कुरेशी

0
31
गोंदिया, दि. २४ :: आगामी लोकसभेची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून ‘फिर एक बार मोदी सरकारङ्क असा नारा देत प्रत्येक कार्यकत्र्याने घरोघरी, जनजनपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजनेतून देशात झालेले सकारात्मक परिवर्तन व विकासाची माहिती द्यावी. याकरीता पक्षाने दिलेले कार्यक्रम नियोजीत पध्दतीने राबविण्याचे आवाहन म्हाडा सभापती व भंडारा जिल्हाध्यक्ष तारीक कुरेशी यांनी केले.
ते भाजपा जिल्हा कार्यालयात २२ जानेवारी रोजी आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, जिल्हा संघटन महामंत्री विरेंद्र अंजनकर, भाऊराव उके, लायकराम भेंडारकर, रविकांत बोपचे, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर आसवानी, रेखलाल टेंभरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले आदी उपस्थित होते. याप्रसंगी म्हाडाचे सभापती तारीक कुरेशी यांच्या प्रथम आगमनावर भाजपा गोंदिया जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नियोजीत कार्यक्रम बुथस्तरापर्यंत राबविण्याचे आवाहन करुन सविस्तर माहिती दिली. तसेच भंडारा-गोंदिया लोकसभा विस्तारक विरेंद्र अंजनकर यांनी आगामी कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली. बैठकीला सर्व मंडळ अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.