राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली

0
10

वाशिम, दि. २४ : २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी हिरवी झेंडी दाखविली.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रुपेश निमके, विस्तार अधिकारी मदन नायक, तुषार जाधव, मुख्य सेविका श्रीमती वाघ, श्रीमती कांबळे, डॉ. पी. एच. साबळे यांची उपस्थिती होती. ही रॅली नियोजन भवन येथून काढण्यात आली व जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये रिसोड आणि कारंजा तालुक्यातील २०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलगा मुलगी-एक समान आदी घोषणा त्यांनी रॅलीदरम्यान दिल्या.