संविधान जनजागृती निबंध स्पर्धा परीक्षा आयोजित

0
83

गोंदिया दि. २४ :: संविधान बचाव कृती संघाच्या वतीने स्थानिक एम.जी. पॅरामेडिकल कॉलेज येथे संविधान जनजागरण सप्ताह अंतर्गत निबंध स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निबंध स्पर्धेत ८ वी ते १० वीपर्यंत तसेच ११ वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता भारतीय संविधान, सामाजिक, शैक्षणिक, जनरल विषयांवर नि:शुल्क परीक्षा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेत विजयी स्पर्धकाला ६ हजार रुपये नगद पुरस्कार २६ जानेवारी रोजी तहसील कार्यालय जवळ आयोजित मुख्य कार्यक्रमात पुरस्कृत केले जाणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रावर माल्यार्पण करून करण्याता आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख क्रांती ब्राम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भदन्त मोग्गलान, राम बिडकर, संजय कांबळे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालक महेंद्र कठाने यांनी केले तर आभार सचिन बांबुर्डे यांनी मानले. यशस्वितेसाठी ओबीसी संघर्ष कृती संघाचे कोषाध्यक्ष कैलाश भेलावे, शिव नागपुरे, अनिल गोंडाणे, विश्वजीत बागडे, अतुल सतदेवे आदींनी सहकार्य केले..