गोंदिया,दि.25ः-गोंदिया रेल्वेस्थानकावरील प्लेटफार्म क्रमांक 4 वर 24 जानेवारीला सायकांळ 4 वाजेच्या सुमारास कुर्लावरुन हावडाकडे जाणारी शालीमार एक्सप्रेस थांबताच सामान्य डब्यातील एका प्रवाश्याने बँग घेऊन उतरण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याचे संतुलन बिघडले आणि रेल्वेगाडीच्या आत ट्रकवर पडत असल्याचे त्याचप्लेटफार्मवर असलेल्या रेल्वे पोलिस ठाण्याचा शिपाई एकनाथ बानबलेच्या निदर्शनास घटना आली.त्यांनी लगेच कुठलाही वेळ न गमावता त्या रेल्वेप्रवाशाच्या काॅलरला व हातांना पकडून वर ओढल्यामुळे त्या प्रवाशाचा जिव वाचला.अन्यथा थोडाही वेळ झाला असता तर रेल्वेगाडीच्या आत येऊन त्या प्रवाशाच्या जीव गेल्याची घटना घडली असती,परंतु पोलिस कर्मचारी बानबले यांची समयसुचकता महत्वाची ठरली.
नंतर त्या व्यक्तीला प्राथमिक उपचाराकरिता रेल्वे रुग्णालयात दाखल केले. यावेळी स्थानकावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही त्याला मदत करीत धीर दिला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.दरम्यान,थोडक्यात आपले प्राण वाचले याची जाणीव त्या प्रवाशाला होताच तो फार घाबरलेला होता. मात्र, त्याला पाणी पाजून शांत करण्यात आले. नंतर प्रवाशांनी आपल्या घरचा रस्ता धरला. मात्र, सुरक्षारक्षक बाणबले यांनी तत्परता दाखविली नसती तर ही घटना त्या प्रवाशाच्या जीवावर बेतली असती.याघटनेनंतर रेल्वे सुरक्षा मंडळ नागपूरचे आयुक्त आशुतोष पांडे यांनी रेल्वे प्रवाशाच्या प्राण वाचविल्याबद्दल रिवार्डस्वरुपात उद्या 26 जानेवारीला प्रशस्ती पत्र व 1 हजार रुपयाचे रोख देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.पोलिस कर्मचारी बानबले यांची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे.





