26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ ठिकठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण

ठिकठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण

0
39

गोंदिया,दि.28-ः जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुकाअ डा.राजा दयानिधी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.जलसंधाण विभाग कार्यालयात जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.आर.चौधरी यांच्या हस्ते “”ध्वजारोहन” सपन्न झाले यावेळी विभागातील अधिकारी/ कमॅचारी उपस्थित होते.कायॅक्रमाचे सचांलन दुलिचंद बुध्दे यांनी केले.उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तिरोडा येथील अदानी पाॅवर प्रोजेक्टच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये प्रकल्पाचे व्यवस्थापक सी.पी.शाहू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी वीज प्रकल्पातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

गोरेगांव,दि.28 :- स्थानीय मॉडेल कॉन्वेन्ट एंड विद्यान कनिष्ट महाविद्यालय गोरेगांव मधे 26 जानेवरी 2019 ला प्रजासत्ताक दिवस श्रीमती मंगला पाकमोड़े यांच्या अद्यक्षतेत तसेच सौ छाया पी मेश्राम, प्राचार्य सौ अरुणा अण्डेल, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे ध्वजारोहक श्री प्राध्यापक आर डी कटरे संस्थापक मॉडेल कॉन्वेन्ट गोरेगांव, यांच्या हस्ते ध्वजारोहनाचे कार्यक्रम करण्यात आले या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत बक्षीस वित्तरणाचे कायक्रम आयोजित करण्यात करण्यात आले बक्षिस वितरण कार्यक्रमात जिल्हास्तर, तालुकास्तर, शाळास्तर तसेच नागपुर मधे आयोजित करण्यात आलेल्या अब्याकस स्पर्धेमधे प्राविन्यप्राप्त विद्यार्थयाना ट्रापि देवून सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे ध्वजारोहक श्री आर डी कटरे सर्, यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थयाना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थयाना प्रसाद वितरण करूँन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.गोरेगाव तहसिल कार्यालयात तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी माजीआमदार हेमंत पटले,खोमेश्वर रहागंडाले,खरेदी विक्रीचे सभापती झामसिंह बघेले,जि.प.माजी सभापती पी.जी.कटरे,नामदेवराव किरसान,माजी तहसिलदार खुशाल खुटमोेडे,वरिष्ठ पत्रकार खेमेंद्र कटरे,हौसलाल रहांगडाले,मलेश्याम येरोला,रेखलाल टेंभरे,डा.लक्ष्मण भगत आदी मान्यवर उपस्थित होते.तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या कार्यालयात सभापती डाॅ.झामसिह बघेले यांच्या हस्ते माजी सभापती सी.टी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण पार पडले.

साखरीटोलाः राजीव गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण संस्था चे अध्यक्ष मा.श्री प्रभाकर दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षतेखाली मा.श्री जि. जी.यावलकर सचिव व प्रमुख उपस्थिती मा.जियालाल पंधरे उपाध्यक्ष, मा. ये .टी. डुंबरे मुख्याध्यापक, सरपंच किशोर रहांगडाले, डी. एस. रहांगडाले, बारसे, डोंगरे योगेशमेश्राम,कटरे,दीप्ती कटरे,बोपचे, शिल्पा टेम्भुर्णीकर, मेश्राम,परिहार, उपस्थित होते.सातगाव येथील सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात प्रभाकर दोनोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.