26.1 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ ओबीसीच्या मागण्यांकरिता आज गडचिरोली बंदचे आवाहन

ओबीसीच्या मागण्यांकरिता आज गडचिरोली बंदचे आवाहन

0
20

गडचिरोली,दि.28ः-ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी घोषित करण्यात यावी यासह ओबीसींच्या विविध मागण्यांकरिता आज २८ जानेवारी रोजी गडचिरोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला शहरातील दुकानदार संघटना, पानठेला चालक-मालक संघटना, ऑटो चालक-मालक संघटनेने तसेच समस्त शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे अवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महसंघ तसेच इतर समविचारी संघटनेने केले आहे.
देशात ढोरांची , गुरांची कुत्र्याची गणना होतो परंतु ओबीसी समाजाची होत नाही आणि ओबीसी समाजाची जणगणना होत नसल्याने ओबीसी समाजाला आरक्षण संखेच्या प्रमाणात आरक्षण नाही आणि आरक्षण नसल्याने रोजगार नाही आणि या मुळेच यामुळे सामाजिक , शैक्षणिक स्तिथी कमकुवत होत आहे आणि याकरिता २0११ ची झालेल्या जनगणनेतुन ओबीसी समाजाची गणना जाहीर करण्याच्या प्रमुख मागणी असून ओबीसी समाजाची गेले कित्येक दिवसापासून सातत्याने निवेदन , आंदोलने करून जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे प्रश्न उचलून पूर्ण करण्याची मागणी करून सुधा सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे ,जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आल्याने सन २00२ पासून वर्ग ३ व ४ च्या पदभरतीतून ओबीसी प्रवर्गातील युवक बाद झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी आज  गडचिरोली बंदचे आवाहन करण्यात आले आहे.