26 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News नक्षल्यांकडून आणखी एका व्यक्तीची हत्या

नक्षल्यांकडून आणखी एका व्यक्तीची हत्या

0
27

गडचिरोली,दि.31ः- जिल्ह्यात नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरू असून पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना तालुका मुख्यालयापासून २0 किमी अंतरावर असलेल्या पेनगुंडा फाट्यावर ३0 जानेवारी रोजी उघडकीस आली. वाले वंजा कुडयामी (५0) असे मृत इसमाचे नाव आहे.
वाले कुडयामी यांचे नक्षल्यांनी सात दिवसापूर्वी अपहरण केले होते. त्यानंतर पोलिस खबर्‍या असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या करून मृतदेह तालुक्यातील पेनगुंडा गावाच्या फाट्यावर ठेवण्यात आला होता. मृतदेहावर नक्षल्यांनी पत्रकसुद्धा ठेवले होते. नक्षल्यांनी यापूर्वी २२ जानेवारीला भामरागड तालुक्यातील कसनासूर येथील तीन नागरिकांची हत्या केली होती. त्यांचे मृतदेह भामरागड-आलापल्ली मार्गावर फेकून दिले होते. त्यानंतर २७ जानेवारीला एटापल्ली तालुक्यातील ताळगुळा येथील व्यक्तीची हत्या केली आणि तिसरी घटना भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे उघडकीस आली.