35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ स्वच्छता जनजागरण रॅलीत माॅडेल कान्व्हेंटचे विद्यार्थी सहभागी

स्वच्छता जनजागरण रॅलीत माॅडेल कान्व्हेंटचे विद्यार्थी सहभागी

0
20

blank

गोरेगाव,दि.02ः-  स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगावच्या वतीने स्वच्छता मिशन जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.ही स्वच्छता रॅली मॉडेल कॉन्व्हेंट  ते शहीद जान्या तिम्या हायस्कुल गोरेगाव पर्यंत काढण्यात आली.त्यानंतर जिल्हा परिषद हायस्कुलच्या पटागंणावर स्वच्छता रॅलीचा समारोप स्वच्छताविषयक प्रबोधन कार्यक्रमानंतर करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार, कृषी अधिकारी कवठे,मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव चे संस्थापक प्रा.आर.डी.कटरे,जि.प.हायस्कुलचे प्राचार्य आर.टी.बिसेन,एम.पी.शेख आधी उपस्थित होते. पाहुण्यांनी स्वछता विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवावे त्याचप्रमाणे इतर लोकांना सुद्धा स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासंबधी आवाहन केले.

blank