गुन्हेवार्ता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना ५ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले February 2, 2019 037 FacebookXPinterestWhatsAppTelegram बीड,दि.02 – जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना ५ लाख रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पुरवठा विभागातील चौकशीचा अहवाल सोयीस्करपणे देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.दरम्यान, लाचलुचपत विभागाने कांबळे यांच्या शासकीय निवासस्थानावर ही कारवाई केली आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.